Disha Salian मृत्यू प्रकरणाची नव्यानं चौकशी करणार, Devendra Fadnavis यांची घोषणा ABP Majha

Continues below advertisement

मुंबई : दिशा सालियन मृत्यू (Disha Salian Case)  प्रकरणावरून हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Winter Session)  आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. दिशा सालियनच्या मृत्यूवेळी तिच्या घरी कोणता नेता होता याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आलीय. नितेश राणे आणि भरत गोगावले यांनी ही मागणी केलीय. दरम्यान, दिशा सालियन प्रकरणावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे सभागृह तीनवेळा तहकूब करण्यात आले. त्यानंतर  दिशा सालियन प्रकरणांची एसआयटीमार्फत (Special Task Force)  चौकशी करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी  विधानसभेत केली आहे. सध्या ही केस पोलिसांकडे असून कुणाकडे काही पुरावे असतील तर ते द्यावेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram