Maharashtra Politics: 'NCP ची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही', Tanaji Sawant यांच्या विधानाने महायुतीत भूकंप

Continues below advertisement
ठाकरे गटाचे नेते दीपेश म्हात्रे (Dipesh Mhatre) यांचा भाजप (BJP) प्रवेश आणि मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलचे (NCP) विधान, या दोन मुद्द्यांनी राज्याचे राजकारण तापले आहे. ‘राष्ट्रवादीची औलाद अशी आहे की सत्तेशिवाय राहू शकत नाही’, असे स्फोटक विधान तानाजी सावंत यांनी धाराशिवमध्ये केले. दुसरीकडे, ठाकरेंना मोठा धक्का देत शिवसेनेचे (UBT) कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 'डोंबिवलीतले अनेक प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेच्या टेबलवर बसणं अत्यंत गरजेचं आहे,' असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कामामुळे प्रभावित होऊन हा निर्णय घेतल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे-कल्याणमध्ये भाजपची ही एक मोठी राजकीय खेळी मानली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola