Dindori Result 2024 : मविआची डोकेदुखी वाढवणारे डुप्लिकेट 'भगरे सर' अखेर सापडले

Continues below advertisement

Dindori Lok Sabha Election Result 2024 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांचा 1 लाख 13 हजार 199 मतांनी पराभव केला. मात्र दिंडोरीच्या मतमोजणी दरम्यान भास्कर भगरे यांच्या नावात साम्य असलेले उमेदवार बाबू सदू भगरे (Babu Bhagare) यांची जोरदार चर्चा रंगली. कारण बाबू सदू भगरे यांनी तब्बल 1 लाख 03 हजार 632 मतं मिळवली. 

दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे पेशाने सर आहेत. तर बाबू भगरे यांच्या नावापुढे सर असे लावण्यात आल्याने अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आता दिंडोरीतील अपक्ष उमेदवार बाबू भगरे हे अचानक गायब झाल्याचे समजते. भास्कर भगरे आणि बाबू भगरे यांचे चिन्हात देखील साधर्म्य असल्याचे दिसून आले. भास्कर भगरे यांचे तुतारी वाजविणारा माणूस तर बाबू भगरे यांचे तुतारी असे चिन्ह होते. 

दिंडोरीतून एक लाख मतं मिळवणारे बाबू भगरे नेमके कोण?  

बाबू भगरे हे तिसरी पास असल्याची माहिती मिळत आहे. नाशिकमधील एकलहरे येथील ते रहिवासी आहेत. बाबू भगरे हे मोलमजुरी आणि मासेमारी करतात. तरीही नावापुढे सर म्हणून उल्लेख होता.  बाबू भगरे यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. मात्र लाखभर मतं मिळाल्याने बाबू भगरे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून बाबू भगरे निवडणुकीला उभे होते याबाबत त्यांच्या शेजाऱ्यांना देखील माहिती नसल्याचे समोर येत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram