Dilip Walse Patil : अजितदादांचा विरोध डावलून काँग्रेस आणि ठाकरे गटाचा प्रस्ताव?वळसे पाटील म्हणतात...
Continues below advertisement
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास प्रस्तावावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याची चर्चा रंगलीय. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून काँग्रेसने प्रस्ताव दाखल केला. मात्र एक वर्षाच्या आत अविश्वास ठराव आणता येत नसल्याने आणि १४ दिवस आधीच ठराव आणावा लागतो, अशा काही तांत्रिक मुद्द्यांवर प्रस्ताव टिकू शकत नाही, म्हणूनच अजित पवार यांनी सही केली नसल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय. मात्र या सगळ्या घडामोडींनंतर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये एकमत नसल्याची आणि अजित पवारांचा विरोध डावलून हा प्रस्ताव सादर केला की काय... अशी कुजबूज सध्या राजकीय वर्तुळात सुरू झालीय.
Continues below advertisement
Tags :
No Confidence Motion MVA Maharashtra Winter Session DIlip Walse Patil Maharashtra Winter Session 2022 MVA निषेध