Dilip Mohite Patil:अपघातानंतर माझा पुतण्या पळून गेला नाही,त्याने मद्यपान ही केलं नव्हतं

Continues below advertisement

Dilip Mohite Patil:अपघातानंतर माझा पुतण्या पळून गेला नाही,त्याने मद्यपान ही केलं नव्हतं  पुण्यातील पोर्शे अपघातानंतर (Pune Porshe Accident) पुन्हा एकदा पुण्यात (Pune Accident) भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे, पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांच्या पुतण्याकडून अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. आमदार पुतण्यानं बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना गाडीखाली चिरडल्याची माहिती समोर येत आहे.   पुणे-नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway) कळंब येथे झालेल्या अपघातात आमदारांच्या पुतण्यानं बेदरकारपणे दोघांना चिरडल्याची माहिती मिळत आहे. दुचाकी आणि कारच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातात ओम सुनिल भालेराव याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, रविवारी मध्यरात्री पुणे नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मयूर मोहिते असं आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्याचं नाव आहे. अपघातावेळी आरोपी आमदार पुतण्यानं मद्य प्राशन केलेले का? याचाही तपास सुरू आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram