Solapur ZP च्या सर्व 14000 कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका डिजीटलाईज, सर्व्हिस बुक मोबाईलवर पाहता येणार
शासकीय कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात सेवा पुस्तकाचे महत्व खूप जास्त आहे. सेवा पुस्तक अदययावत नसल्यास सेवानिवृत्तींनंतर देखील कर्मचाऱ्यांना अडचणींना सामोरं जावं लागतं. यावर सोलापूर जिल्हा परिषदेने अनोखा उपाय शोधून काढलाय. जिल्हा परिषदेच्या सर्व 14 हजार कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिका ह्या डिजीटलाईज करण्यात आल्या आहे. यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेने विशेष असे अॅप देखील तयार केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपले सर्व्हिस बुक हे मोबाईलवर पाहता येणार आहे.