Digital Arrest Scam | अमरावतीत निवृत्त न्यायाधीशांना 31 लाखांचा गंडा, Cyber Crime ची तक्रार
Continues below advertisement
अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावतीमधील फ्रेजपुरा भागात राहणाऱ्या एका 71 वर्षीय निवृत्त न्यायाधीशांना 'डिजिटल अरेस्ट' करून 31 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. 25 सप्टेंबर रोजी अज्ञात आरोपींनी त्यांना पहिला कॉल केला. तुमच्या नावाच्या सिम कार्डद्वारे 40 लोकांना अश्लील मेसेज पाठवल्याची धमकी आरोपींनी दिली. तसेच, मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये सहभाग असल्याचं सांगून त्यांना धमकावण्यात आलं. 13 दिवसांनंतर माजी न्यायाधीशांना 'डिजिटल अरेस्ट' झाल्याचं लक्षात आलं. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांनी सायबर क्राईम पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. अमरावती सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सायबर गुन्हेगारांनी वापरलेली ही नवीन पद्धत चिंताजनक आहे. नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement