NCP And Shivsena : राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटात मतभेद वाढले?

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटात मतभेद वाढत चाललेत की काय, असा प्रश्न अनेक जण विचारू लागले आहेत. याचं कारण म्हणजे ईव्हीएम, अदानी आणि मोदींची डिग्री या तिन्ही मुद्द्यांवरून राष्ट्रवादीचे नेते आणि संजय राऊतांनी वेगवेगळी मतं व्यक्त केली आहेत. अदानींवर ठाकरे गटानं सडकून टीका केली.. मात्र पवारांनी विरोधकांच्या अदानी विरोधी मोहिमेतली हवाच काढून टाकली.. दुसरीकडे, मोदींच्या डिग्रीवरूनही शरद पवार आणि संजय राऊतांमधले मतभेद समोर आले. मोदींची डिग्री हा देशासमोरचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा नाही.. बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे दाहक प्रश्न आहेत, विरोधकांनी त्यावर लक्ष केंद्रीय केलं पाहिजे असं पवार म्हणाले. यावर संजय राऊतांनी देखील प्रतिक्रिया दिली.. मोदींची डिग्री खरी असायला हवी एवढीच आमची भूमिका आहे असं राऊत म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram