Dhule Weekend Lockdown | धुळ्यात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

Continues below advertisement
संपूर्ण राज्यासह धुळे जिल्ह्यामध्ये देखील वीकेंड लॉकडाऊन काल संध्याकाळी 8 नंतर सुरू झाला आहे. परंतु लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर देखील धुळेकरांना मात्र लॉकडाऊनचं गांभीर्य समजलेलं दिसत नाहीये. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतर देखील बेजबाबदार धुळेकर सर्रासपणे रस्त्यावरती फिरताना बघायला मिळत आहेत. अशा बेजबाबदार धुळे कराणमुळेच धुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आणखीनच वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे करूनच संसर्ग कमी व्हावा यासाठी प्रशासनाकडून कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत मात्र दुसरीकडे नागरिकांकडून प्रशासनाचे आदेश झुगारून लावण्यात आले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, यामुळे राज्य शासनाची ब्रेक द चेन मोहीम फोल ठरली आहे. बेजबाबदार धुळेकरांना अखेर पोलिस प्रशासनातर्फे खाक्या दाखविला जात आहे.  
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram