Petrol Pump Robbery | धुळ्यात Petrol Pump वर 22 हजार रुपयांची लूट, CCTV मध्ये कैद

Continues below advertisement
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात दहिवत येथील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील एका पेट्रोल पंपावर दरोड्याची घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला. कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडील बावीस हजार रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून चोरटे दुचाकीवरून पसार झाले. ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. या धाडसी दरोड्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी परिसरातील नाकाबंदी वाढवली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola