Dhule COVID Free : धुळे जिल्ह्याची कोरोनाच्या विळख्यातून सुटका, 516 दिवसांनंतर जिल्हा कोरोनामुक्त
धुळे जिल्ह्याची कोरोनाच्या विळख्यातून सुटका झाली आहे.. सध्या धुळे जिल्ह्यात कोरोनाचा एकही सक्रीय रुग्ण नाही.. काल दोन रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर धुळे जिल्हा कोरोनामुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. तब्बल 516 दिवसानंतर जिल्हा कोरोना मुक्त झाला असून जिल्ह्यातील सगळेच विलगीकरण कक्ष पूर्णपणे रिकामी झाल्याचं सकारात्मक चित्र पाहायला मिळतंय.