Dharmraobaba Aatram On Vidhansabha विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात आम्ही जागा मागणार : धर्मरावबाबा आत्राम
Dharmraobaba Aatram On Vidhansabha विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात आम्ही जागा मागणार : धर्मरावबाबा आत्राम
दर्भात पक्षाचा वीस जागा लढवण्याचा विचार आहे.. विदर्भातील सहा जागांवर आधीच आमचे आमदार आहेत, उर्वरित 14 कोणत्या असाव्यात आणि त्या जागांवर कोणाला उभे करायचे आहे याचा विचार सुरू केलं आहे... मात्र, प्रत्येक जिल्ह्यात किमान एक जागा तरी लढवण्याचा आमचा प्रयत्न राहील असे आत्राम म्हणाले... दरम्यान, अनिल देशमुख यांच्या विरोधात अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विशेष प्लॅन असल्याचा खुलासा ही आत्राम यांनी केला... अनिल देशमुख विरोधात जर भाजपकडे सक्षम उमेदवार नसेल, तर आमच्याकडे देशमुख कुटुंबातूनच तगडा उमेदवार आहे... त्यामुळे अनिल देशमुख यांच्या विरोधात आम्ही एक देशमुखच उभा करू असा दावा ही त्यांनी केला.. या क्षणाला जरी देशमुख कुटुंबाचा कोणीही आमच्या पक्षात नसला, तरी निवडणुकीपर्यंत भरपूर वेळ असून देशमुख कुटुंबातील त्या व्यक्तीला आमच्या पक्षात प्रवेश देऊ आणि उमेदवारी देऊ असा दावा ही आत्राम यांनी केला... दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत अजित पवार यांनी चमत्कार दाखवत दुसऱ्या पक्षातील किमान सहा आमदारांचे समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मिळवले... क्रॉस वोटिंग करणाऱ्यांपैकी जे आमदार भविष्यात आमच्या पक्षात येतील आणि ते सक्षम असतील, तर त्यांना विधानसभा निवडणुकीत आमचे पक्षातून उमेदवारी देण्यासंदर्भात आमचा पक्ष निश्चितच विचार करेल असे ही आत्राम म्हणाले.