Dharmaveer 2 Trailer : Anand Dighe यांचा मृत्यू ते शिंदेंना धोका, धर्मवीर 2 चा ट्रेलर वाद पेटवणार?

Dharmaveer 2 Trailer :

Dharmaveer 2 : येत्या 9 ऑगस्ट रोजी धर्मवीर- 2 (Dharmaveer) सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. मागील अनेक दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमात प्रसाद ओक आणि क्षितिज दाते हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रसाद ओकने (Prasad Oak) आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भूमिका साकारली आहे. 

धर्मवीर- 2 सिनेमांत अनेक गोष्टींचा उलगडा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आनंद दिघेंच्या मृत्यूचं गुढ, एकनाथ शिंदेंच्या बंडाची गोष्ट अशा अनेक प्रश्नांची उत्तर या ट्रेलरमधून मिळणार का? याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय मंडळी उपस्थित होती. 

ट्रेलरमध्ये काय?

दरम्यान या ट्रेलरमध्ये काही संवादांनी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचं कारण, आनंद दिघे यांचा मृत्यू कसा झाला असे अनेक प्रश्न उपस्थित करणारे संवाद यामध्ये आहेत. आनंद दिघे हे म्हणतात की,कुणाशीतरी आघाडी करुन तुम्ही विकलात तो भगवा रंग. हा संवाद सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या क्षितिज दातेच्याही एका संवादाने लक्ष वेधून घेतलं आहे, 20 वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करुन गेला आहे. 

'धर्मवीर-2'या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई,उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे कथा,पटकथा,संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनीच निभावली असून कॅमेराम न म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिले आहे.  

धर्मवीर-2 सिनेमा हा सिनेमा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच नाही,तर संपूर्ण देशभरात हा सिनेमा प्रदर्शित केला जाईल.  धर्मवीर या सिनेमानंतर धर्मवीर 2 सिनेमाची प्रेक्षकांना बरीच उत्सुकता होती. येत्या 9 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता या सिनेमात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola