Dharmaraobaba Atram : शरद पवारांना वाटलं असतं तर अजित पवार कधीच मुख्यमंत्री झाले असते - आत्राम

Continues below advertisement

Dharmaraobaba Atram  : शरद पवारांना वाटलं असतं तर अजित पवार कधीच मुख्यमंत्री झाले असते - आत्राम

हेही वाचा : 

 लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election) वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्या सामना पाहायला मिळणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्याप जागावाटप निश्चित झाले नाही. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबतचा (Mahayuti Seat Sharing) फॉर्म्युलाच 'एएनआय'शी बोलताना सांगून टाकला आहे. यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.     येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेचच राज्यात निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू होईल. साधारण 20 सप्टेंबरच्या आसपास विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता अजित पवार यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.   प्रत्येक पक्षाकडे असलेल्या जागा त्यांच्याकडेच राहतील  महायुतीच्या जागावाटपाबाबत अजित पवार म्हणाले की, आमच्या तीनही पक्षांकडे ज्या ज्या जागा आहेत त्या त्या जागा त्यांच्याकडे ठेवल्या जातील. पण जर काही सिटींग जागा बदलायच्या असतील तर त्याही प्रकारची तयारी आणि मानसिकता तिन्ही पक्षांनी आणि मित्र पक्षांनी ठेवली आहे. आता लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिलेले आपल्या पाहण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram