Terna Dam Overflow | धाराशिवमधील Terna प्रकल्प ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांना दिलासा

धाराशिवमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील महत्त्वाचा तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रकल्पाचे जलपूजन केले. तेरणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे धरण सत्तरच्या आधी बांधले गेले आहे. अनेक गावांचे अर्थकारण या धरणातील पाण्यावर अवलंबून आहे. तेरणा नदीवरही अनेक गावांचे जीवन अवलंबून आहे. पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना या धरणावरून झालेल्या आहेत. त्यामुळे या धरणाचे महत्त्व इथल्या पूर्ण जनजीवनासाठी महत्त्वाचे आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola