Dhangar Samaj English School Special Report : संभाजीनगरमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

Continues below advertisement

Dhangar Samaj English School Special Report : संभाजीनगरमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमधील गैरव्यवहाराला एबीपी माझानं वाचा फोडल्यानंतर मोठी खळबळ उडाली. सरकारचे कोट्यवधी रुपये लाटल्याच्या आरोपांवरून २५ शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आणि संबंधितांवर कारवाईचे लेखी आदेशही देण्यात आले. तरीही स्पष्ट आदेश असताना संचालकांनी पुन्हा गुणवत्ता तपासणीचे आदेश देत मान्यता देण्याच्या हालचाली सुरू केल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या निर्णयामागे राजकीय वरदहस्त असल्याचीही चर्चा रंगली आहे. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट...काही महिन्यांपूर्वी एबीपी माझानं गोरगरीब धनगर मुलांसाठी सुरु असलेल्या राजे यशवंत होळकर योजनेचा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट केला होता...त्यामध्ये ही योजना राबवणाऱ्या अनेक इंग्रजी शाळांमध्ये वसतिगृह, विद्यार्थी केवळ कागदावरच मात्र अनुदान पूर्णपणे उचलण्यात आलं होतं...माझाच्या रिपोर्टनंतर इतर प्रशासन जाग झालं....या योजनेची सत्यता तपासण्यासाठी पथकं नेमण्यात आली.... त्यानंतर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालन्यातील २७ पैकी २५ वसतिगृहांची मान्यता रद्द करण्यात आली मात्र आता पुन्हा त्याच वसतिगृहांना पुन्हा मान्यता देण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola