Dhangar Morcha : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणीसाठी धाराशिवमध्ये मोर्चा
धाराशिव जिल्ह्यातील धनगर समाजाचा मोर्चा आज शहरात निघाला आहे. धनगर समाजाच्या एस. टी. आरक्षण अंमलबजावणी करून प्रमाणपत्र वाटप करावेत या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता लेडीज क्लब इथून मोर्चा सुरू होवून संत गाडगेबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लहुजी वस्ताद साळवे चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे जात आहे. धनगर समाजातील अहिल्या देवींच्या वारसा असलेल्या मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चासाठी धाराशिव जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल धनगर समाज जिल्हा धाराशिव यांच्यावतीने करण्यात आले होते