Dhangar Reservation : आरक्षण दिलं नाही तर लोकसभेत फटका बसेल, धनगर समाजाचा सरकारला इशारा
धनगर समाजाला अनुसुचित जमातींमधून आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची निर्णायक भूमिका ठरवण्यासाठी आज पंढरपुरात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीत ७५ वर्षात झाला नाही असा निर्णय घेऊ असं धनगर नेत्यांनी म्हटलंय. महाराष्ट्राचा सातबारा केवळ मराठा समाजाच्या नावावर केल्यासारखं सत्ताधारी वागत आहेत अशी टीकाही धनगर समाजाच्या नेत्यांनी केलीय. सरकारने अनुसुचित जमातींतून आरक्षण दिलं नाही तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकांत फटका बसेल असा इशारा सरकारला देण्यात आला.