4-4 खाती सांभाळूनसुद्धा विधानसभा राखता आली नाही,त्यांनी आमची कुवत विचारणे हास्यास्पद:Dhananjay Munde

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी एका प्रचारसभेत बोलताना सामाजिक न्याय हे 32 नंबरचे खाते असून, या खात्याचा मंत्री लोकांना काही देऊ शकत नसतो, अशा आशयाचे वक्तव्य करत एकप्रकारे सामाजिक न्याय विभागाला कमी लेखले होते, याचाच संदर्भ घेऊन धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. 'आम्हाला कुणी नाव ठेवत आहे, आमची कुवत काढली जात आहे, आम्ही गरीब माणसं आहोत. पण ज्यांनी पूर्वी 4-4 खाती सांभाळली तरी जनतेने त्यांना 32 हजाराने नाकारले, त्यांची कुवत काय असावी; त्यांनी आमची कुवत विचारणे निव्वळ हास्यास्पद आहे, असा खोचक टोला धनंजय मुंडे यांनी लगावला. केज नगरपंचायत निवडणुकी अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे यांची केजमध्ये सभा झाली त्यावेळी ते बोलत होते. 

केज नगर पंचायत निवडणुकीत विरोधी पक्षांची अजब युती असून, इथे भाजप आमदार, भाजप खासदार, राष्ट्रीय नेते असूनही केज नगर पंचायत निवडणुकीत भाजपचा कमळ चिन्ह असलेला एकही उमेदवार रिंगणात नाही, हे महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यापर्यंत कुणीतरी पोहचवा, अशी टिप्पणी धनंजय मुंडे यांनी केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola