Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?

Continues below advertisement

मकोका लागलेल्या वाल्मिक कराड प्रकरणावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाब वाढतच चाललाय...धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर कोर्टात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा अंजली दमानिया यांनी दिलाय. आजपर्यंत ज्यांची भेट घेतली, त्यांनी कार्यवाही का केली नाही यासाठी त्यांनाही प्रतिवादी करावं लागेल, असं दमानिया यांनी म्हटलंय. दमानिया यांनी सोमवारी याबाबत अजित पवारांची भेट घेतली होती. दमानियांच्या मागणीवर बोलताना अजित पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केलीय. जे दोषी नाहीत त्यांच्यावर कारवाईचा प्रश्नच नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. दुसरीकडे आपल्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारच उत्तर देतील, असं धनंजय मुंडेंनी सांगितलंय. तर याबाबतचा निर्णय अजित पवारानांच घ्यायचा आहे, फडणवीसांचा संबंध नाही, असं सुरेश धस यांनी म्हटलंय...

मंत्री धनंजय मुंडेंनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली...  सध्या सुरु असलेल्या वादावर ही भेट झाली असण्याची शक्यताय... सातत्याने भाजप आमदार सुरेश धसांसह विरोधकांकडून, कराड प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतेय... आणि याच सर्व घडामोडींच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंनी भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्यात.. दरम्यान धनंजय मुंडे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत... 

विरोधकांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीवर, उत्तर देताना मंत्री धनंजय मुंडे भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं... यावेळी त्यांनी तिसरीत शिकणाऱ्या मुलीचं उदाहरण देताना,  मी राजीनामा द्यावा की देऊ नये मी दोषी आहे की नाही याबाबत जे काही आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं असं ते म्हणाले... 

वाल्मिक कराडप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.. यावेळी कराडला फरार होण्यात मदत करणाऱ्यांना सहआरोपी करा अशी मागणी सुरेश धस यांनी केली. तर आका बीडचे सुपर पालकमंत्री होते असं म्हणत धस यांनी कराड आणि धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram