Dhananjay Munde : धंनजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा, वाढता विरोध तरी दादा पाठिशी Special Report

Continues below advertisement

Dhananjay Munde : धंनजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा, वाढता विरोध तरी दादा पाठिशी Special Report

 बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणामुळे राज्य सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. या हत्याप्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. विशेष म्हणजे विरोधकांनीही हे प्रकरण चांगलेच लावून धरले असून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव आल्यानंतर या मागणीने चांगलाच जोर धरला आहे. दरम्यान, एकीकडे वाल्मिक कराडला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात असताना आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी एक फोटो पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे. हा फोटो पोस्ट करत मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत, जनता अगतिक झाली आहे, असा दावा त्यांनी केलाय. 

संजय राऊत यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे? 

संजय राऊत यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे बसलेले दिसत आहेत. संतोष देशमुख यांच्या खुनाचा आरोप असलेला वाल्मिक कराड हादेखील या फोटोमध्ये उभा असलेला दिसतोय. विशेष म्हणजे वाल्मिक कराडच्या बाजूलाच धनंजय मुंडे उभे असलेले दिसत आहेत. या फोटोवर 21 ऑगस्ट 2024 रोजीची असे प्रिंट झालेले दिसत आहे. हा फोटो पोस्ट करून 'एका फ्रेममध्ये सगळे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास खरंच होईल का? मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहेत. ग्रामस्थ म्हणतायेत सरकारला जमत नसेल तर सरकारने गावाला लाकडं पाठवून द्यावी. आम्ही सगळे जळून घेतो. असंही कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच आहे. ⁦अगतिक जनता' असं म्हणत राऊत यांनी संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram