Dhananjay Munde On Pankaja Munde : 20 वर्ष सेवा केली म्हणून आज मंत्री झालो: धनंजय मुंडे
Continues below advertisement
बीडच्या धारूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. आता यालाच धनंजय मुंडे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. गेल्या 20 वर्षापासून मी मतदार संघातील जनतेची सेवा करत आहे. त्याच्यामुळे मी आमदार झालो मंत्री बनू शकलो, एकदा मंत्री झालो म्हणून मी जनतेला कसा विसरेल मी कायम यांच्या ऋणात राहू इच्छितो म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे. मी मी म्हणणारे नेतृत्व जनतेला नको असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. आणि आता यालाच धनंजय मुंडे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Pankaja Munde Dhananjay Munde Beed Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv