Dhananjay Munde : दुष्काळसदृश भागाचे तात्काळ पंचनामे सुरु करा, जिल्हाधिकाऱ्यांना कृषिमंत्र्यांचे आदेश
मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक घेतली..मराठवाड्यातील दुष्काळ सदृश भागात तात्काळ पंचनामे सुरू करा, तसंच तलावांमधील पिण्याच्या पाण्याचे, जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन करा असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेत.