Dhananjay Munde On Maharashtra Assembly 2024 : दोन निवडणुकांचा मुहतोड जवाब द्यायचाय, माझा अस्त करण्याचा प्रयत्न
Dhananjay Munde On Maharashtra Assembly 2024 : दोन निवडणुकांचा मुहतोड जवाब द्यायचाय, माझा अस्त करण्याचा प्रयत्न
दोन निवडणुकीचा मुहतोड जवाब द्यायचा आहे - धनंजय मुंडे उमेदवारी मागे घेतल्यानंतर चित्र स्पष्ट झाले, त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंगळवारपासून परळी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. पहिल्याच जाहीर भाषणात धनंजय मुंडे यांनी माझा पराभव करण्यासाठी व्ह्यूरचना केली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा नेमका रोख कुणावर? हा सवाल उपस्थित होतो आहे. परळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी परळीतील व्यापारांशी संवाद साधला. दरम्यान झालेल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी मला दोन निवडणुकीचा मुहतोड जवाब द्यायचा आहे. असं म्हटलंय. मी अडचणीचा ठरू शकतो म्हणून माझा अस्त करण्याची तयारी सुरू आहे. तर लोकसभेत पंकजा ताईंचा जसा पराभव केला तसा विधानसभेत माझा पराभव करण्यासाठी व्ह्यूरचना केली जात असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचा रोख नेमका कुणावर? असा सवाल उपस्थित होतोय.