ABP News

Dhananjay Munde : धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी, वांद्रे कौटुंबीक न्यायालयाचा निर्णय

Continues below advertisement

Dhananjay Munde : धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी, वांद्रे कौटुंबीक न्यायालयाचा निर्णय 

मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरले आहेत. करुणा शर्मा यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणातील जी तक्रार केली होती. त्यातील आरोप मान्य करण्यात आले आहेत. वांद्रे फॅमिली कोर्टानं हा निर्णय दिला आहे. करुणा शर्मा यांनी केलेले आरोप मान्य केले आहेत. वांद्रे फॅमिली कोर्टाच्या निर्णयानंतर धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये द्यावे लागणार आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय,  "करुणा मुंडे या फॅमिली कोर्टात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि १,२५,००० रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram