Dhananjay Munde Clean Cheat | धनंजय मुंडेंना दिलासा, पण'क्लीन चीट' नाही, सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची गरज
Continues below advertisement
धनंजय मुंडेंना मिळालेल्या दिलाशावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात येऊ नये अशी विनंती फडणवीसांना करणार असल्याचं दमानिया म्हणाल्या. त्यांना अद्याप क्लीन चीट न मिळाल्यानं संधी न देण्याची मागणीही दमानियांनी केली आहे. या प्रकरणाला सुप्रीम कोर्टात आव्हान न देण्याची गरज असल्याचं देखील अंजली दमानिया म्हणाल्या. भ्रष्टाचाराचा खूप मोठा अँगल आहे, जो त्याच्या वकिलांनी कोणीही मांडलेला नाही, असे दमानियांनी नमूद केले. या गोष्टी त्या ऑर्डर मधे आलेल्या नाहीत. त्यामुळे "याला कुठल्याही अँगल नी क्लीन चीट नक्कीच म्हणता येत नाही," असे दमानियांनी स्पष्ट केले. याचिकाकर्त्यांनी सुद्धा एसएलपी फाइल करायला हवी, असे त्यांचे मत आहे. धनंजय मुंडे यांची कधीही मंत्रिमंडळात वापसी करून घेऊ नये असं फडणवीसांना मी विनंती करते, असे दमानिया म्हणाल्या. धनंजय मुंडेंसारखे आणि माणिकराव कोकाटे यांसारखे निष्क्रिय मंत्री कृषी विभागाला लाभले असतील तर शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या दुर्दशेवर चिंता व्यक्त केली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement