Dhananjay Munde on Jarange: जरांगेंना वाटतं की धनंजय मुंडे ह्या पृथ्वीतलावरच नसावा' थेट आरोप
Continues below advertisement
मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि सामाजिक तणावाच्या मुद्द्यांवरून राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'मनोज जरांगेंना वाटतं की धनंजय मुंडे ह्या पृथ्वीतलावरच नसावा, यासाठीही धडपड सुरू आहे', असे खळबळजनक विधान मुंडे यांनी केले. आपण पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यात ८० हजार कुणबी प्रमाणपत्रे दिल्याचा दाखलाही त्यांनी दिला. तसेच, मराठा समाजाला नक्की फायदा कशात आहे, ओबीसी (OBC) आरक्षणात की ईडब्ल्यूएस (EWS) आरक्षणात, याचा खुलासा जरांगेंनी करावा, असे आव्हान मुंडे यांनी दिले. दोन वर्षांपासून राज्यात जातीय सलोखा बिघडला असून, सख्खे भाऊही विचारांमुळे पक्के वैरी झाले आहेत, या सामाजिक तडावासाठी त्यांनी जरांगे यांच्या भूमिकेला जबाबदार धरले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement