Dhananjay Mahadik Election Commission : महिलांना धमकी, धनंजय महाडिक यांना निवडणूक आयोगाची नोटीस

Continues below advertisement

Dhananjay Mahadik Election Commission : महिलांना धमकी, धनंजय महाडिक यांना निवडणूक आयोगाची नोटीस
 अक्षेपार्ह विधानाबाबत निवडणूक विभागाकडून धनंजय महाडिक यांना नोटीस   तात्काळ खुलासा सादर करण्याचे निवडणुक आयोगाचे आदेश  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून निवडणुकीची आचार संहिता १५ ऑक्टोंबर, २०२४ पासून लागू झालेली आहे.   निवडणुकीच्या अनुषंगाने महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी पाचवा स्टॉप फुलेवाडी ता.करवीर येथील राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता - २०२३ चे कलम १७९ अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आले. 

हे ही वाचा.
भाजप खासदार आणि नांदेडचे नेते अशोक चव्हाण हेही जिल्ह्यातील राजकारणात निवडणुकांच्या अनुषंगाने सक्रीय झाले आहेत. भाजपा महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. दुसरीकडे लोकसभा पोटनिवडणुतही भाजप महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे लक्ष्य त्यांच्यापुढे आहे. त्यामुळे, विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी अशोक चव्हाण मोट बांधत आहेत. त्याच अनुषंगाने पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया दिली. तसेच, शरद पवारांनी केलेल्या टीकेवरही पलटवार केला आहे. अशोक चव्हाण हे संधीसाधू असल्याची बोचरी टीका शरद पवारांनी केली होती. आता, शरद पवारांच्या टीकेला अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलंय. मी संधीसाधू तर शरद पवार कोण, याचंही उत्तर त्यांना द्यावं लागेल, असे चव्हाण यांनी म्हटलं.     

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram