Dhananjay Deshmukh On Dhananjay Munde | बीडमध्ये सामाजित सलोखा बिघडल्याचा खोटा आव, धनंजय देशमुखांचं मुंडेेंना अप्रत्यक्ष उत्तर
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात थेट राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. आरोपींच्या समर्थनार्थ अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी आणि बॅनरबाजी वारंवार केली जात आहे. लोकप्रतिनिधींनी सामाजिक सलोखा बिघडवला असा खोटा आरोप लादला जात असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. मात्र, देशमुख कुटुंब कुठेही जातिवाद करत नसल्याचं म्हणत धनंजय देशमुख यांनी अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याला उत्तर दिलंय. या प्रकरणात आरोपींना पाठिशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावाही धनंजय देशमुख यांनी केला आहे. या हस्तक्षेपामुळे प्रकरणाच्या तपासावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सामाजिक सलोखा बिघडवण्याचे आरोप निराधार असून, देशमुख कुटुंब न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.