Dhananjay Deshmukh : बीड सरपंच हत्याप्रकरणाला जातीय रंग देऊ नका, धनंजय देशमुखांची मागणी

Dhananjay Deshmukh : बीड सरपंच हत्याप्रकरणाला जातीय रंग देऊ नका, धनंजय देशमुखांची मागणी

संतोष देशमुखचा गु्न्हा काय होता? गावातील एक दलित वॉचमनला मारहाण होताना तो रोखायला गेला, खंडणी मागणाऱ्यांना विरोध केला म्हणून त्याची निर्घुण हत्या केल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला. संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना मोक्का लावा, त्यांना बिनभाड्याच्या खोलीत ठेवा अशी मागणी त्यांनी केली. या आरोपींना त्यांच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना भेटू देऊ नका, त्यांची तेरे नाम चित्रपटातील सलमान खान सारखी अवस्था झाली पाहिजे असा टोलाही सुरेश धस यांनी लगावला. मुंबईतील सरपंच परिषदेमध्ये सुरेश धस बोलत होते. 

कोणताही सरपंच धाडस करणार नाही

गावासाठी चांगलं काम करणाऱ्या संतोष देशमुखची हत्या झाली. तो पुढे जाऊन जिल्हा परिषद सदस्यही झाला असता. पण त्याची निर्घुण हत्या केल्यामुळे कोणताही सरपंच समाजसेवेचं काम करण्यासाठी पुढे येणार नाही. त्यामुळे सर्वांनी मिळून संतोष देशमुखच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल याची काळजी घ्यायला पाहिजे असं आवाहन आमदार सुरेश धस यांनी केलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola