Dhananjay Deshmukh : माझ्या भावाची हत्या जातीवादातून नाही; संतोष देशमुखांच्या भावाचं वक्तव्य

Continues below advertisement

Dhananjay Deshmukh : माझ्या भावाची हत्या जातीवादातून नाही; संतोष देशमुखांच्या भावाचं वक्तव्य
बीड : जिल्ह्यातील मसाजोग गावच्या सरपंच हत्या प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळाच्या विधानपरिषद सभागृहात उमटले आहेत. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणी तपासाचा मुद्दा उपस्थित करत थेट वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन गावकऱ्यांचा संशय असल्याचे म्हटले. तसेच, मंत्री धनंजय मुंडेंकडेही बोट दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देत याप्रकरणी तपास सुरू असून पोलिसांवरही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. आता, यावरच देशमुख यांच्या भावाकडून मोठे वक्तव्य करण्यात आले आहे. माझ्या भावाची हत्या जातीवादातून झालेली नाही. राजकारण्यांनी संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात जात आणू नये असेही धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. दरम्यान, उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापासून बीड जिल्ह्यात जातीय ध्रुवीकरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आणि ओबीसी अशी विभागणीही येथील काही गावांत दिसून आली होती.   सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा काही जणांकडून या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातच, आज विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानपरिषदेत हा मुद्दाही उपस्थित झाला होता. त्यावर, फडणवीसांनी माहिती देताना, याप्रकरणी एसआयटी नेमली असून तपास सुरू असल्याचं म्हटलं आहे. आता, धनंजय देशमुख यांनीही एसआयटीवर विश्वास ठेवावा लागेल, असे म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात SIT नेमली असून त्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. ते लवकरात लवकर आरोपींना जेरबंद करतील. तर या प्रकरणात जातीवादाचा काहीच संबंध येत नाही, असं देखील मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे, याप्रकरणाला जातीय रंग देण्याचा होत असलेला प्रयत्न चुकीचा असल्याचे धनंजय देशमुख यांनी सूचवले आहे. मात्र, याप्रकरणात राजकीय किंवा जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या दबावातून चालढकलपणा किंवा काहींना सूट देण्याचा प्रकार घडतोय का, याचीही चर्चा जिल्ह्यात होत आहे.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram