Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच

Continues below advertisement

Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच

 मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असणाऱ्या वाल्मिक कराड याला मंगळवारी केज सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. वाल्मिक कराडच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येईल. ही सुनावणी सुरु होण्यापूर्वी न्यायाधीशांकडून वाल्मिक कराडला, 'सीआयडी कोठडीत तुम्हाला मारहाण झाली का?', हा प्रश्न विचारतील. वाल्मिक कराड याने या प्रश्नाचे उत्तर नाही म्हणून दिले तरच पुढील प्रकियेला सुरुवात होईल.

वाल्मिक कराड याने न्यायाधीशांसमोर सीआयडी कोठडीत आपल्याला मारहाण झाली, असे सांगितले तर त्याचा वैद्यकीय अहवाल मागवला जाईल. न्यायालयात हजर करण्यापूर्वी मंगळवारी सकाळीच बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड याची डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. काल सीआयडीने वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने घेतले होते. आवादा कंपनीकडून घेण्यात आलेल्या खंडणीप्रकरणात कराड याचे व्हॉईस सॅम्पल घेण्यात आले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram