Santosh Deshmukh Case | आरोपींना जर सोडलं तर माझा खून करतील, मी स्वत: संपवून घेतो- धनंजय देशमुख
Santosh Deshmukh Case | आरोपींना जर सोडलं तर माझा खून करतील, मी स्वत: संपवून घेतो- धनंजय देशमुख
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांची हत्या कशी करण्यात आली? संपू्र्ण घटनाक्रम जाणून घेऊयात..
9 डिसेंबर संतोष देशमुख यांचा अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची हत्या झाल्याचे पुढे आले..
10 डिसेंबर या हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांना केज तालुक्यातील तांबवा या ठिकाणाहून अटक झाली..
12 डिसेंबरला घुले या तिसऱ्या आरोपीला पुण्याच्या रांजणगाव येथून अटक झाली..
18 डिसेंबरला विष्णू चाटे याला बीडमधून अटक करण्यात आले..
4 जानेवारी ला सुदर्शन घुले, सुधीर सांगळे ला पुण्यातून अटक झाली..तर सिद्धार्थ सोनवणे याला कल्याण मधून अटक झाली..
याप्रकरणी कृष्णा आंधळे हा एकमेव आरोपी सध्या फरार आहे..
कशी झाली संतोष देशमुखांची हत्या ?
6 डिसेंबरला आवादा एनर्जी या पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार हे खंडणी मागण्यासाठी गेले असता तेथील सुरक्षा रक्षक अशोक सोनवणे मारहाण केली..त्यामुळे त्याने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख आणि त्यांचे साथीदार भांडण सोडवण्यासाठी गेले. मात्र तिथे परत भांडण वाढले आणि यात दोन गटात भांडण झाले.. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला..
यानंतर अशोक सोनवणे यांनी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराच्या विरोधामध्ये केज पोलीस स्टेशनमध्ये आवादा एनर्जी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने तक्रार दिली..सुदर्शन घुले व इतर तीन जणांविरोधात केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला..9 डिसेंबरला दुपारी तीन वाजता संतोष देशमुख यांचे केज- मांजरसुबा हायवेवरच्या टोलनाक्यावरून काळ्या स्कार्पिओ गाडीतून आलेल्या मारेकर्यांनी अपहरण केले..अपहरण झाल्यानंतर संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख याने पोलिसांना फोन लावून याची माहिती दिली. पोलीस सुद्धा संतोष देशमुख याचा शोध घेऊ लागले..