Sanjay Rathod Exclusive | हे शक्तिप्रदर्शन नव्हतं, जनतेचं माझ्यावरचं प्रेम आहे : संजय राठोड

"दहा दिवसांपासून मी मुंबईलाच होतो, आता परत कामाला सुरुवात करण्याआधी संत सेवालाल महाराज आणि भगवान मुंगसाजी महाराज जे माझे श्रद्धास्थान आहेत, या श्रद्धास्थानाचा आशीर्वाद घेऊन, त्यांच्या समाधीवर डोकं ठेवून उद्यापासून मी कामाला सुरुवात करणार आहे." , असं संजय राठोड म्हणाले

"हे शक्तिप्रदर्शन नव्हतं. जनतेचं प्रेम माझ्यावर आहे. मी चार वेळा निवडून आलेलो आहे, राज्यातील विक्रमी मतदान मिळालं. मला आशीर्वाद देतात." , असं संजय राठोड म्हणाले

"सर्वत तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. ज्या पद्धतीने मी जनतेला शब्द दिलेला आहे त्या पद्धतीने विकासाचं काम चालू आहे. ते पूर्णत्वास नेऊन भाविक आणि भक्तांसाठी खुले होणार आहे." ,  असं संजय राठोड म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola