Dhairyasheel Mane on PM Modi Sabha : जिथे मोदींची सभा, तिथे विजय निश्चित! धैर्यशील मानेंना विश्वास
Dhairyasheel Mane on PM Modi Sabha : जिथे मोदींची सभा, तिथे विजय निश्चित! धैर्यशील मानेंना विश्वास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर हातकणंगलेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेतात त्या त्या ठिकाणी उमेदवार उच्चांकी पद्धतीने निवडून आले आहेत. त्याचीच प्रचिती कोल्हापूरमध्ये देखील पाहायला मिळेल असं धैर्यशील माने म्हणाले आहेत.