Navnityananda Modak Maharaj Accident : कल्याणमधील मोडक महाराजांच्या अपघाती निधनाने भक्तांवर शोककळा

कल्याणसह मुंबई आणि कोकण परिसरात श्री स्वामी समर्थांच्या १७ मठांची स्थापना करत अध्यात्मिक वारसा जपणाऱ्या नवनित्यानंद मोडक महाराज यांच्या अपघाती निधनाने हजारो भक्तांवर शोककळा पसरली आहे. सोमवारी सकाळी कोल्हापूर महामार्गावर हा भीषण कार अपघात झाल्याची माहिती आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच हजारो भक्तगण काल रात्रीपासूनच कल्याण पश्चिमेतील श्री स्वामी समर्थ मठामध्ये दाखल झाले आहेत. मोडक महाराजांनी कल्याणसह मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना करत हजारो भक्तांना अध्यात्मिक प्रवाहात आणण्यासाठी मोठे योगदान दिले.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola