Special Story | भेटी लागी जीवा लागलीसे आस, स्ट्रेचरवरून घेतलं सावळ्या विठूरायचं दर्शन
सोलापूर येथील एक तरुण डॉक्टर राजाराम ज्ञानेश्वर होमकर याना एका अपघातात दुर्दम्य व्याधी लागली आणि यामुळे गेल्या चार वर्षांपासून त्यांच्या शरीराचा कोणताही अवयव हालचाल करू शकत नसल्याने ते संपूर्णपणे झोपून आहेत . गेल्या काही दिवसापासून विठ्ठल दर्शनाची अंतिम इच्छा ते आपल्या वडिलांना बोलून दाखवत होते . अखेर सोमवारी दुपारी होमकर कुटुंब आणि त्यांचे डॉक्टर मित्र रुग्णवाहिकेतून या चाळीस वर्षाच्या विठ्ठल भक्ताला स्ट्रेचरवर झोपवून पंढरपुरात आले.