Fadnavis Letter to Sonia : यह पब्लिक है,सब जानती है, देवेंद्र फडणवीसांचं सोनिया गांधींना पत्र

मुंबई : देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतच जात असताना महाराष्ट्रातील परिस्थितीही फारशी चांगली नाही. रुग्णसंख्या काही अंशी कमी झालेली असली तरीही कोरोनाचं संकट आणि दर दिवशी सापडणारे हजारो नवे रुग्ण मात्र आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनापुढील अडचणी वाढवत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील एकंदर कोरोना परिस्थिती आणि त्याचा देशातील परिस्थितीशी असणारा संबंध यावर भाष्य करणारं एक पत्र भाजप नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं आहे. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्देशून त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola