Delhi : देवेंद्र फडणवीस घेणार सहकारमंत्री अमित शाहांची भेट, इतर भाजप नेते ही राहणार उपस्थित

Continues below advertisement

सहकाराच्या मुद्द्यावर राजधानी दिल्लीत एक महत्वाची बैठक होणार आहे. महाराष्ट्राचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात साखर कारखानदारीचा अनुभव असलेले काही भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाहांची भेट घेणार आहेत. देशाचे नवे सहकार मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर या क्षेत्रासाठी केंद्र सरकारचे नेमके धोरण काय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवरती ही महत्त्वाची बैठक आज होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील हे नेते असणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram