Devendra Fadnavis on Amravati violence : महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतोय?
Continues below advertisement
Devendra Fadnavis on Amaravi violence : महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतोय, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यभरात एकाच दिवशी, 12 नोव्हेंबर रोजी निघालेले मोठे मोर्चे हे पूर्वनियोजित होते असा आरोपही त्यांनी केला. कोणत्याही हिंसाचाराचे समर्थन होऊ शकत नाही. मात्र, अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार हा 12 नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेची प्रतिक्रिया होती असेही फडणवीस यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी दंगलग्रस्त भागाला भेट दिली. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून पोलीस आणि प्रशासनाने त्यासाठी प्रयत्न करावे असेही त्यांनी म्हटले. सरकारने रझा अकादमीवर बंदी घालावी अशी मागणीही फडणवीसांनी केली.
Continues below advertisement