Devendra Fadnavis Speech Yavatmal : बळीराजा जलसिंचन योजनेअंतर्गत विदर्भाला, मोदींचे आभार
ज्या यवतमाळ मध्ये जगातील एकमेव सीता मातेचं मंदिर आहे तिथं आज मोदींच्या हस्ते नारी वंदन कार्यक्रम होत आहे. साडे पाच लाख बचत गटांना revolving fund म्हणून कोट्यवधींचा निधी दिला जात आहे. मोदी नेहमी म्हणतात फक्त चार जाती आहेत, गरीब, शेतकरी, युवा आणि महिला.. आज या चारही जातींना मदत मिळत आहे. शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आज 4 हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. शिवाय मोदी आवास योजनेअन्वये घरे दिली जाणार आहे, त्यात ही महिलांना घराचा संयुक्त मालकी हक्क मिळेल. सिंचनाच्या योजनाही देऊन विदर्भाचा सिंचन अनुशेष दूर केले जात आहे. वर्धा ते कळंब पर्यंत रेल्वे ही मिळत आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.