Devendra Fadnavis UNCUT | नारायण राणे 'दबंग नेता' : देवेंद्र फडणवीस
मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्ग येथे खासदार नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन आज दुपारी अमित शाह यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. अमित शाह यांचा आजचा महाराष्ट्र दौरा हा महत्वाचा मानला जातोय. अमित शाह यांच्या पायगुणाने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जावे अशी इच्छा नारायण राणे यांनी व्यक्त केली आहे. कोकण हा शिवसेनेचा गड मानला जातोय. पण गेल्या काही दिवसांपासून भाजपने या भागात नारायण राणेंच्या माध्यमातून शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आजचा अमित शाह यांचा दौरा त्याचाच भाग असल्याचं सांगण्यात येतंय.
Tags :
Devendra Fadnavis Speech Union Home Minister Mahavikas Aghadi Chandrakant Patil Medical College Narayan Rane Home Minister Sindhudurg Devendra Fadnavis Amit Shah