Maharashtra - Karnataka सीमाप्रश्नाबाबत देवेंद्र फडणवीस यांचा अमित शाहंना फोन, काय झाली चर्चा?
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. पण कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य करून सीमावादाला नव्यानं फोडणी दिली. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाभागात सध्या तणावाचं वातावरण आहे. त्यात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून मंगळवारी बेळगावातल्या हिरेबागवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्रातल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली होती. ही सारी माहिती फडणवीसांनी अमित शाह यांच्या कानावर घातली.