Fadnavis on Corporations | 'जातिवाद' आरोप, CM फडणवीस यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या महामंडळांवरील टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांनी केवळ एकाच महामंडळाला लक्ष्य केल्याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या मते, विरोधकांच्या डोक्यात जातिवाद होता. त्यांना जनतेच्या कामाशी काही देणेघेणे नाही. पण आता त्यांच्या लक्षात आले आहे की, सगळीच महामंडळे सक्रिय होत आहेत. महामंडळे तयार करत असताना त्याची कंपनी, उपकंपनी स्थापनेची आणि संचालकांच्या नेमणुकीची ही सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ही प्रक्रिया आम्ही पूर्ण केली आहे. ती प्रक्रिया पूर्ण केल्यावरच त्याच्यावर डायरेक्टर्स नेमले जातात. त्यामुळे आता विरोधकांच्या पोटात काय दुखतंय, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. जनतेच्या हितासाठी आणि त्यांच्या कामासाठी महामंडळे सक्रिय करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.