Devendra Fadnavis : नगरपंचायत निवडणुकीत भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष : देवेंद्र फडणवीस

Continues below advertisement

मुंबई : राज्यभरातील 106 नगरपंचायतीत आज फटाके फुटले, गुलाल उधळला गेला. या निवडणुकीत प्रचाराचा केंद्रबिंदू होता ओबीसींचं राजकीय आरक्षण. निवडणुकीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगित दिली.  त्यामुळे सहाजिकच निवडणुकीचा फोकस पॉईंट हा ओबीसीचा मुद्दा होता. आता ओबीसी मतांची टक्केवारी आणि प्रभावामुळे राजकीय  वर्तुळातील सगळे मोहरे  केंद्रबिंदूला धरून होते. म्हणून आरक्षण स्थगित झालं असलं तरी उमेदवार ओबीसीच असणार अशी घोषणा सर्वपक्षीय नेत्यांनी केली. त्यामुळे कोणत्या पक्षाचं क्षेत्रफळ वाढणार आणि कोणाचा परिघ कमी होणार?  याकडे लक्ष लागलं होतं. ओबीसींना कोणी डावललं ठाकरे सरकारनं की फडणवीस सरकारने? इम्पेरिकल डेटा, राज्य सरकारने दडवला की केंद्र सरकारने? यावर राजकीय नेते, ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक आप-आपली मतं मांडत होते, तर  दुसरीकडे निकालाच्या दिवसापर्यंत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरुच होती. रस्त्यांवरची लढाईही पहायला मिळत होत्या. या सगळ्या धामधुमीत महागाई, बेरोजगारी, कोरोना संकटात नडला आणि नाडला गेलेला मतदार काय विचार करत होता? तसचं ओबीसीच्या राजकीय हक्कावर गदा येतीय का? हा प्रश्न होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram