Devendra Fandavis : देवेंद्र फडणवीस का घाबरतात उद्घाटन सोहळ्याला? सांगितला मजेदार किस्सा
विधानसभा निवडणुकीवेळी तेल लाऊन देवेंद्र फडणवीस विरोधकांशी दोन हात करण्यासाठी आखाड्यात उतरले होते. मी कोणालाच घाबरत नाही असं म्हणत ते वारंवार विरोधकांना आव्हान ही द्यायचे. पण तेच देवेंद्र फडणवीस एका उद्घाटन सोहळ्याला मात्र घाबरतात. पुण्याच्या लोणावळ्यात स्मशानभूमीच्या उद्घाटनप्रसंगी स्वतः फडणवीसांनी याची कबुली दिली. स्मशानभूमीच्या उदघाटनाला चला म्हटलं की मला भीतीच वाटते. त्याचं कारण ही त्यांनी सांगून टाकलं. मी नागपूरचा महापौर असताना तेंव्हाचे विरोधीपक्ष नेत्यांच्या वॉर्डात गेलो होतो. तिथं स्मशानभूमीच्या उद्घाटनावेळी मला पहिलं लाकूड मला ठेवायला लावलं, मग इतरांनी सरण रचलं. त्यानंतर टेम्भा (अग्नी मशाल ) हातात देऊन अग्नी ही द्यायला लावला. असं म्हणतात एकच हशा पिकला. पण सुदैवाने तुम्ही तसं काही केलं नाही. हे माझं नशीब म्हणायचं. असं म्हणत ते स्मशानभूमीच्या उद्घाटन कार्यक्रमाला का घाबरतात हे फडणवीसांनी स्पष्ट केलं.