कारवाई कायद्यानं व्हावी, Anil Deshmukh यांच्या CBI कारवाईवर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचा आरोप केल्यानंतर खळबळ उडाली होती. आता CBI च्या प्राथमिक चौकशी अहवालात Anil Deshmukh यांना क्लिनचिट देण्यात आल्यासंदर्भात एक अहवाल माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात भेट झाल्याचे पुरावे नाहीत, असं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अर्थात अद्याप याबाबत सीबीआयकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. या अहवालाबाबत सीबीआय सोडून कुणीही सत्य सांगू शकत नाही. आता याबाबत सत्य लोकांसमोर आणलं लोकांची मिडियाची आणि त्यांची जबाबदारी आहे, असं मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement