Sanjay Rathod Resignation | राजीनामा पहिल्याच दिवशी द्यायला पाहिजे होता : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोप होत असलेल्या मंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मात्र, हा राजीनामा पहिल्याच दिवशी द्यायला पाहिजे होता, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांना वाचावण्याचा प्रयत्न झालाय, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण इतकं गंभीर असूनही अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही. 20 दिवसानंतरही एफआयआर दाखल होत नाही याचा अर्थ काय? संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. माध्यमं आणि भाजपने हे प्रकरण लावून धरलं नसतं तर हे प्रकरण सरकारने दाबलं असतं, असेही फडणवीस म्हणाले. दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या विरोधात बदनामीचं षडयंत्र आहे. मात्र, भाजप संपूर्णपणे चित्रा वाघ यांच्या पाठीशी असल्याचेही ते म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola