Devendra Fadnavis Pune Speech:संपूर्ण पुण्यात मेट्रोचं जाळं पसरणार,देवेंद्र फडणवीसांचं पुण्यात भाषण

Continues below advertisement

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. २६ सप्टेंबर रोजी निश्चित झालेला मोदींचा पुणे दौरा पावसामुळे रद्द झाला होता. आज दुपारी पंतप्रधान मोदी ऑनलाईन उपस्थितीत राहून प्रतीक्षेत असलेला जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या मार्गाचे लोकार्पण करणार आहेत. सकाळी 11 वाजता गणेश क्रीडा मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे ज्याला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार . मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, उदय सामंत, छगन भुजबळ उपस्थितीत पंतप्रधान मोदी आज पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार, मुरलीधर मोहोळ उपस्थित सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाचंही आज भूमीपूजन शिवाजीनगर-स्वारगेट या मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन करणार गणेश कला क्रीडा सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन  छगन भुजबळ भाषण -   भारतातील मुलींची पहिली शाळा जिथे आहे तिथे स्मारक होणार आहे त्याचं भूमिपूजन आज होतंय आज या कार्यक्रमाचा आनंद सगळ्यांना आहे  ४ माळी इमारत आहे. तळ मजला याठिकाणी सावित्रीबाई यांचा पुतळा आहे  या गोष्टीसाठी २० वर्ष लढावा द्यावा लागला २००० पासून असलेले स्वप्न आज पूर्ण होतंय महात्मा फुले महापालिकेचे ६ वर्ष सदस्य होते तेव्हा ब्रिटिश कमिशन होती सावित्रीबाई ५० वर्ष काम करत राहिल्या सगळ्यांचे आभार -------------------------------------------------------------------------------  अजित पवार भाषण -   २६ तारखेला पाऊस होता. पंतप्रधान यांनी ते पाहायला वर पुणेकरांना त्रास होऊ नये त्यांची ईच्छा झाली की पुणेकरांची वाहतुकीची अडचण म्हणून हा कार्यक्रम पुढे ढकलला विरोधकांना कळत नाही राज्यात आचारसंहिता लवकरच जाहीर होणार आहे विमानतळाचा कार्यक्रम सुद्धा पुणेकरांना लवकर मिळावा म्हणून मोदींनी आधी केला स्वारगेट मेट्रो स्टेशन पाहिल्यानंतर आपल्याला अभिमान वाटेल हिंजवडी ते शिवाजीनगर चे काम टाटा यांना दिले आहे मान्य करतो की हे काम होताना पुणेकरांना त्रास सहन करावा लागतो पण  पुढील १०० वर्षांच्या कामासाठी थोडा त्रास करावा लागतो भिडे वाडा लहान आहे पण तिथे आम्ही चांगले आर्किटेक्ट लावले  राज्य सरकार ने जागा मिळवण्यासाठी सर्व पणाला लावले सोलापूर विमानतळ मध्ये पण खूप अडचणी आल्या पण आज त्याचे उद्घाटन करण्यात येतंय  टोयोटा किर्लोस्कर ची आवृत्ती आता संभाजीनगर मध्ये होणार  तरुण तरुणींना रोजगार मिळावा, राज्याला गती मिळावं या गोष्टींचे समाधान पंतप्रधान यांनी वाढवन बंदराचे काम पहिल्याच कॅबिनेट मध्ये दिला आज मला गिरीश बापट यांची आठवण येते, मेट्रो कामासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी तिथे राजकारण आणू दिले नाही स्वतःच्या कारकीर्दीमध्ये काम काही करायचं नाही पण आंदोलन करायचं हे पुणेकरांनी समजून घ्या  -------------------------------------------------------------------------------- देवेंद्र फडणवीस भाषण -   वारसा आणि विकास या दोन्ही गोष्टींचा संगम करणारा आजचा कार्यक्रम आहे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी जो वारसा दिला तो पुढे नेण्याचा कार्यक्रम आहे सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शाळेतून आमच्या मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडली आम्ही सगळे भिडे वाडा लढाई मध्ये आलो, इथलं स्मारक आपल्याला प्रेरणा देईल पुणे समाजसुधारक यांची भूमी आहे. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आपल्यासाठी महातवची गोष्ट विकासाचा सुद्धा आज कार्यक्रम आहे कार्यक्रम पुढे ढकलला गेला. काही लोकं छाती बडवत होते.  यांनी कधी एक पिलर बांधला नाही. आधी कामं करा आणि नंतर छात्या बडवत रहा स्वारगेट मेट्रो स्टेशन पूर्ण झाल्यावर प्रवास करण्यासाठी ते पाहायला येतील सगळे टप्पे पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील सगळ्या कोपऱ्यात मेट्रो ने प्रवास करता येईल लवकरच सोलापूरला विमासेवा सुद्धा सुरुवात होणार आहे पण काही लोकांच्या पोटात दुखु लागलं पण काळजी करू नका लवकरच सेवा सुरू करण्यात येणार आहे पाच वर्ष आपण जर कळ काढली तर राज्यातील सर्वात नियंत्रित वाहतूक कुठे असेल तर पुण्यात असेल --------------------------------------------------------------------------------  एकनाथ शिंदे भाषण -   उद्घाटन २६ सप्टेंबर रोजी होणार होता. मोदी जी संवेदनशील मनाचे आहेत पण जेव्हा सकाळी चर्चा केली पण पुणेकरांना त्रास होऊ नये या गोष्टी पंतप्रधान यांनी लक्षात घेल्या संवेदनशील पंतप्रधान कसा असतो हे त्यांनी दाखवलं उद्घाटन केलं असतं तर म्हणले असते लोकांना त्रास देऊन केलं इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं विरोधक बदलापूर मध्ये आरोपीला फाशी द्या फाशी द्या म्हणले. आरोपी फायर करतो तेव्हा पोलीस शोपिस धरणार का? ते केलं नसतं तर म्हणणार बंदूक शोपीस साठी आहे का इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं, दोन्ही बाजूने बोलणाऱ्याना काय म्हणतात? विरोधक लाडक्या बहिण योजनेत खोडा घालतात पण माझ्या बहिणी त्यांना जोडे दाखवतील जो बायडन आणि मोदी यांचा स्नेह आपण पहिला आहे. विश्वात मोदींना जे प्रेम मिळतंय ते आपला अभिमान आहे काही लोकं विदेशात जाऊन देशाची बदनामी करतायत सगळ्यांनी ठरवलं की मोदींना हटवायचे पण ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले  मोदींचा प्रभाव वाढतोय, विरोधकांच्या पोटात दुखत आहे पुण्यातील एक उद्योग बाहेर चालला होता पण मी तेव्हा अधिकाऱ्यांना सांगितलं की रस्ता बनवा आणि तो बनवा गेला पुरंदर विमानतळाचे काम लवकर करा, शेतकऱ्याला नुकसान होऊ नये, त्यांना चांगला मोबदला द्या लाडक्या बहिणींची योजना हिट झाली आहे १ कोटी ९० लाख बहिणींच्या खात्यात गेले आहेत लवकरच सगळे पैसे दिले जाणार आहेत किती ही खोडा घातला ही योजना निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केली नाही

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram