Maratha Reservation | सरकारच्या घोळामुळे मराठा आरक्षण अडचणीत : देवेंद्र फडणवीस
मराठा आरक्षण प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणी सुरु होताच व्हर्च्युअल सुनावणी ऐवजी प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची विनंती सर्व पक्षकारांच्या वतीनं करण्यात आली. त्यानंतर मराठा आरक्षणावरील सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी स्थगित करण्यात आली. आता 5 फेब्रुवारी रोजी याप्रकरणी ऑनलाईन सुनावणी होणार की, प्रत्यक्ष सुनावणी याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.
यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारच्या घोळामुळे मराठा आरक्षण अडचणीत येत असल्याचं फडणवीस म्हणाले. तसेच सरकार प्रत्येक सुनावणीत वेगळी भूमिका मांडत असल्याने संभ्रम निर्माण होत असल्याचं फडणवीस म्हणाले.

Tags :
Supreme Court News Maratha Aarakshan Maratha Aarakshan Latest News Maratha Reservation News Ashok Chavan Mukul Rohatgi Marathi News Latest News BJP Devendra Fadnavis Maratha Reservation